दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट

दहावीच्या निकालाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मोठी अपडेट समोर आली

दहावी निकाल उद्या जाहीर होणार

दहावी बोर्डाचा निकाल उद्या (2 जून 2023) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा? ते जाणून घ्या

'या' वेबसाइटवर दुपारी १ वाजता जाहीर होणार निकाल

दहावीच्या मार्च - एप्रिल 2023 परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.

कुठे पाहाल निकाल?

www.mahresult.nic.in , http://sscresult.mkcl.org , https://ssc.mahresults.org.in, www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

स्टेप 1 - महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.

स्टेप 2 - दहावीच्या निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.

स्टेप 3 - तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.

स्टेप 4 - तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.

स्टेप 5 - एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

स्टेप 6 - निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

VIEW ALL

Read Next Story