राहा ते वामिका अन्...; सेलिब्रिटींच्या मुलांच्या नावांचा नेमका अर्थ तरी काय?

या सेलिब्रिटींच्या मुलांची नावं आहेत फारच Unique! तुम्हालाही मिळू शकते प्रेरणा

सोनम कपूरच्या मुलाचं नाव

अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने तिच्या मुलाचं नावं वायू असं ठेवलं आहे. सोनम आणि आनंद आहूजा यांनी हे नाव ठरवल्याचं सांगितलं जातं.

वायू नाव का ठेवलं?

सोनमने दिलेल्या माहितीनुसार वायू हा पंचतत्वापैकी एक तत्व आहे. त्यामुळेच मुलाचं नाव वायू ठेवण्यात आलं आहे असं सोनमने सांगितलं आहे.

आलिया आणि रणबीरच्या मुलीचं नाव

आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीचं नाव राहा (Raha) असं ठेवलं आहे. रणबीरची आई नितू कपूर यांनी हे नावं ठेवलं आहे.

राहा नावाचा अर्थ काय?

आलियाने दिलेल्या माहितीनुसार राहा या नावाचा अर्थ स्वाहिली भाषेत आनंद असा होतो. तर संस्कृत भाषेत राहा नावाचा अर्थ वंश वाढवणारी व्यक्ती असा होतो. तसेच बंगलामधील राहा नावाचा अर्थ आराम, निवांतपणा असा होतो. अरबी भाषेत या शब्दाचा अर्थ शांति असा होता.

प्रियंकाच्या मुलीचं नाव

प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने त्यांच्या मुलीचं नाव मालती मॅरी चोप्रा असं ठेवलं आहे. दोन्ही कुटुंबातील नावांपासून हे नाव ठेवण्यात आलं आहे असं या दोघांनी सांगितलं.

मालती नावाचा अर्थ काय?

मालती नावामधील मा हे अक्षर प्रियंकाची आई मधुमालती यांच्या नावातून घेण्यात आलं आहे. तर मॅरी हे नाव निकची आई डॅनिस मॅरी मीलर जोनास यांच्या नावातून घेण्यात आलं आहे.

बिपाशाच्या मुलीचं नाव

अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हरने त्यांच्या मुलीचं नाव देवी असं ठेवलं आहे.

देवीचा अर्थ काय?

देवी शब्दाचा अर्थ दैवी असा होतो. आईच्या आशिर्वादाने आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. त्यामुळेच आम्ही मुलीचं नाव देवी ठेवल्याचं बिपाशा आणि करणने सांगितलं.

विराट-अनुष्काच्या मुलीचं नाव

विराट कोहली आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं आहे.

वामिकाचा अर्थ काय?

वामिकाचा अर्थ दुर्गा देवी असा होता, असं विराट आणि अनुष्काने मुलीचं नाव जाहीर करताना म्हटलेलं.

VIEW ALL

Read Next Story