नखं कापण्यासाठी जवळपास प्रत्येकजण लहान मोठ्या आकाराच्या नेलकटरचा वापर करतो.
नेलकटरमध्ये अनेक टूल्स असतात ज्याचा वापर करून तुम्ही नख कापू शकता तसेच नखांना शेप सुद्धा देऊ शकता.
तुम्ही पाहिलं असेल की नेलकटरच्या तळाला होल असतो परंतु त्याचा नेमका उपयोग काय हे अनेकांना माहित नसते.
नेलकटरच्या तळाशी असलेल्या होलमुळे नेलकटर उघडणे, त्याचे बेल्ड फिरवणे आणि बंद करणे सोयीचे होते.
बऱ्याचदा कापलेलं नख हे नेलकटरमध्ये जाऊन अडकतं, अशावेळी तुम्ही होलच्या मदतीने अडकलेलं नख बाहेर काढू शकता.
नेलकटरच्या तळाशी असलेल्या होलमुळे तुम्ही त्याला चावीचे किचन देखील लावू शकता.
एखादी जड तार वाकवण्यासाठी तुम्ही नेलकटरचा उपयोग करू शकता. नटबोल्ट उघडण्यासाठी तुम्ही नेलकटरच्या तळाशी असलेल्या होलचा वापर करू शकता.
घरी डास मारण्याची काॅईल लावण्यासाठी देखील तुम्ही नेलकटरच्या या भागाचा उपयोग करू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)