काही लोकांना मोठी दाढी ठेवायला आवडते तर काहीजण क्लीन शेव लूक ठेवणं पसंत करतात.
अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की महिन्यातून किती वेळा दाढी करायला हवी.
पुरुषांनी महिन्याभरात कितीवेळा दाढी करायला हवी याबाबत मेडिकल सायन्समध्ये कोणतेही नियम नाहीत. हे प्रत्येकाच्या त्वचेवर आणि सोयीवर अवलंबून आहे.
त्वचेच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं असतं की आठवड्यातून एकदा दाढी करायला हवी. म्हणजेच महिन्यातून 4 ते 5 वेळा दाढी करणं ठीक मानलं जातं.
तज्ज्ञ सांगतात की, ज्यांची त्वचा संवेदनशील आहे अशा लोकांनी रोज दाढी करणं टाळायला हवं. अन्यथा त्वचेशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात.
दररोज दाढीवर रेजर फिरवल्याने त्वचेची एक लेयर निघून जाते. ज्यामुळे त्वचा हिल होण्यासाठी देखील वेळ मिळत नाही आणि त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या निर्माण होतात.
नेहमी दाढी ठेवणाऱ्या पुरुषांनी दाढीची योग्य निगा राखायला हवी अन्यथा दाढीच्या केसात घाण जमा होते आणि ज्यामुळे त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)