तुम्हीपण मोबाइलचा ब्राईटनेस जास्त ठेवता का?

सध्या एकंदरीत सर्वांकडे स्मार्टफोन आहे.

सोशल मीडियामुळे आपण जास्त वेळ मोबाईवर असतो.

आणि त्यामुळे अनेकदा फोनच्या ब्राईटनेस मुळे डोळ्यांवर ताण येऊन त्रास होऊ लागतो.

त्यासाठी मोबाईल फोनचा ब्राईटनेस किती असावा हे जाणून घेणं गरजेचं आहे.

असं म्हणतात की फोनचा ब्राईटनेस हा कमी असल्यानं डोळ्यांवर ताण कमी पडतो.

तर काहींचे मत आहे की ब्राईटनेस जास्त असणे गरजेचे आहे ज्यामुळे स्क्रीन वर लिहिलेलं वाचताना डोळ्यांवर जास्त दबाव पडत नाही.

खरंतर यासाठी कोणताही ठरवलेला पॅटर्न नाही आहे.

जर तुम्ही या एका छोट्या गोष्टीची काळजी घेतल्यास फोनचा ब्राईटनेस मुळे होणाऱ्या समस्यांपासून वाचता येऊ शकते.

फोन ची ब्राईटनेस ही आसपास च्या प्रकाशाचा प्रमाणात ठेवावी.

जसं की तुम्ही बाहेर असाल तर फोन ची ब्राईटनेस ही वाढवा.

तर त्यातुलनेत तुम्ही रात्रीच्या वेळी फोन ची ब्राईटनेस ही 50 हून कमी ठेवा.

VIEW ALL

Read Next Story