अधिकतर लोकांना परफ्यूम लावणं खूपच आवडतं कारण परफ्यूम मुळे लोकांना फ्रेश वाटतं.
नेहमी शरीराला सुगंधीत ठेवणारा परफ्यूम मात्र आपल्या आरोग्यासाठी धोक्याचं कारण बनू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, अधिक काळ सुगंध टिकण्यासाठी परफ्यूम मध्ये शरीरासाठी घातक असलेल्या केमिकल्सचा वापर केला जातो.
परफ्यूमच्या अधिक वापरामुळे त्वचेसंबंधी आजार उद्धवू शकतात. त्वचेवर परफ्यूम लागल्याने त्वचेची जळजळ, पुरळ, वंध्यत्व अशा गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
काही लोकांना परफ्यूमची अॅलर्जी असते. परफ्यूमुळे डोकेदुखी तसेच स्किन इन्फेकशनसारख्या समस्या उद्भवतात.
शरीराच्या संवेदनशील भागांच्या आसपास परफ्यूम लावणे टाळा. यामुळे त्वचेला जळजळ आणि खाज येण्याची शक्यता असते.
शरीराच्या ज्या भागावर जखम झाली असेल त्या भागाच्या आसपास सुद्धा परफ्यूम लावणे धोक्याचे ठरते.
तोंड आणि नाकाच्या आसपास परफ्यूम लावल्याने परफ्यूम मधील केमिकल्समुळे आरोग्याला धोका पोहचू शकतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)