महागड्या लिपस्टिक्स जुन्या झाल्या तरी फेकायची इच्छा होत नाही. अशा वेळी या लिपस्टिक्स काही क्रियेटिव्ह पद्धतीने वापरा.
या जुन्या झालेल्या लिपस्टिकपैकी दोन वेगळ्या लिपस्टिक घ्या, त्यांना नीट मिसळून एक नवीन शेड बनवा.
जुन्या झालेल्या एकाद्या लिपस्टिकला लिप बाममध्ये मिसळून एक मऊ आणि फिका शेड बनवा.
असे लिपबामचे फिकट शेड रोज वापरा. त्यामुळे ओठ सुंदर तर दिसतीलच आणि मुलायमही राहतील.
सध्या बाजारात अनेक चमचमत्या शेडच्या लिपस्टिक्स मिळतात. या लिपस्टिक्स तुम्ही घरात बनवू शकता.
या चमकदार लिपस्टिक बनवण्यासाठी वितळलेल्या जुन्या लिपस्टिकमध्ये आयशेडो टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा.
वितळलेल्या लिपस्टिक्समध्ये नारळाचे तेल टाका त्यानंतर योग्य प्रमाणात पातळ करा आणि आवडत्या शेडच्या लिपस्टिकला लिक्विड बनवा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)