केसातील कोंडा घालवण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय

Jul 21,2024


केसांतील कोंडा इतका वाढतो की जाण्याचे नावही घेत नाही. यामुळे अनेकदा बाहेर फिरताना लाज वाटते.


जर तुम्हालाही कोंड्यामुळं त्रास होत असेल तर या उपायांनी सुटका मिळवू शकता.


कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलात लिंबू मिसळून डोक्याला नीट लावू शकता.


केसांना दही लावल्याने कोंडा दूर होण्यास मदत होते.


कोंडा दूर करण्यासाठी कडुलिंबाचा रस केसांना लावू शकता.


अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये केळी मिसळून केसांना लावल्याने कोंडा दूर होतो.


लसूण बारीक करून केसांना १५ मिनिटे लावून ठेवू शकता.


केसांना अंड्यातील पिवळ बलक देखील लावू शकता, यामुळे कोंडा जाण्यास मदत होते (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story