पीरियड्समध्ये चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी

पीरियड्सच्यावेळी योग्य आहार घेणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या समस्या वाढू शकतात.

तळलेले पदार्थ

समोसे,पकोडे,चिप्स यांसारख्या तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर तेल असते. असे पदार्थ खाल्ल्याने पोटात सूज आणि वेदना होऊ शकतात. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान तेलकट पदार्थ खाणं टाळा.

कॅफिन

चहा,सोडा आणि कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते. कॅफिनमुळे निर्जलीकरण होऊ शकते.यावेळी कॅफिन असलेले पदार्थ पिऊ नये.

ब्रोकोली आणि कोबी

ब्रोकोली आणि कोबीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि सल्फर असते ज्यामुळे पोटत गॅस होण्याची शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान या भाज्यांचे सेवन करणं टाळा .

गोड पदार्थ

केक, कुकीज,मिठाई खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे मूड स्विंग आणि थकवा येऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान गोड पदार्थ कमी खा आणि आंबट पदार्थ खाणं टाळा.

दुग्धजन्य पदार्थ

मासिक पाळीच्या दरम्यान दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये यामुळे पोटात सूज येऊ शकते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story