पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध महागड्या गोष्टींचा वापर करत असतात.
मात्र, काही झाडं आपल्या घरांमध्ये असतील तर घरात माश्या, डास येणारच नाहीत.
ज्यामध्ये आपल्या घरात असणारी औषधी गुणधर्म असणारी तुळस. ही डासांना दूर ठेवते.
त्याचबरोबर घराभोवती असणारा लेमन ग्रास डास आणि कीटक यांना घरात येण्यापासून रोखण्याचं काम करते.
लॅव्हेंडर वनस्पती ही घरामध्ये असेल तर त्यापासून येणाऱ्या सुगंध हा कीटकांना घरापासून दूर ठेवतो.
तुम्ही डासांना पळवून लावण्यासाठी घरासमोर किंवा इतर मोकळ्या जागेत झेंडू लावू शकता.
घरात पुदिना लावल्याने त्याच्या सुगंधापासून डास घरामध्ये येणार नाहीत.
तसेच रोज मेरीच्या वुडी वासामुळे देखील डास आपल्या घराच्या आजूबाजूला येणार नाहीत.