लहान वयातच केस पांढरे झाले आहेत? तर 'हे' उपाय करून पहा

Jul 17,2024


आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आणि बदलत्या आहारामुळे केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे.


तणाव, चुकीचा आहार, अनियमित जीवनशैली आणि प्रदूषण अशी अनेक कारण यामागे आहेत.


पण तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठीचे हे घरगुती उपाय आहेत. ज्यामध्ये काही प्रमुख मसाले आणि औषधी वनस्पती आहेत. हे मसाले फक्त केसांसाठीच फायदेशीक नसून आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहेत.

कढीपत्ता

भारतीय स्वयंपाकघरात आढळणारं हे छोटसं पान केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कढीपत्त्यामध्ये जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे केस मजबूत आणि काळे ठेवण्यास मदत करतात.

आवळा

आवळा हे एक आयुर्वेदिक औषध आहे जे केस काळे करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने केसांची वाढ होते.

मेथी

मेथीचे दाणे हे केसांसाठी फायदेशीर असतात. मेथीचे दाणे रात्रभर भिजवून पेस्ट करून लावल्याने केस गळती थांबते आणि पांढरे केस काळे होण्यास मदत करते.

काळी मिरी

काळी मिरी ही तुमच्या जेवणाला मसालेदार तर बनवतेच त्याचबरोबर केसांता रंग टिकवून ठेवण्यास देखील मदत करते. काळी मिरीमध्ये असलेले पाइपरिन केसांसाठी फायदेशीर आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story