लाडू खायला सर्वांनाच आवडतात. तीळ, खोबरं, बुंदी , शेव, बेसन याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे लाडू अगदी चवीने खाल्ले जातात.
गूळ शेंगदाणे स्वतंत्रपणे खाण्यास आपण आळस करतो. खरतर थोडसं गूळ आणि शेंगदाणे खाणं आरोग्यासाठी चांगले असते. त्यावेळी गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू खाणं कधीही उत्तम. हे लाडू उपवासाच्या दिवशी देखील खाऊ शकतो.चला तर मग बघूयात हे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे.
सर्वप्रथम शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घ्या.
भाजलेले शेंगदाणे एका मोठ्या परातीमध्ये काढून थंड करून घ्या.
शेंगदाणे थंड झाले की दोन्ही हाताने मॅश करून त्याची साल काढा आणि शेंगदाणे चांगले फटकून घ्या.
त्यानंतर चाकूच्या मदतीने गूळाचे छोटे तुकडे करा आणि मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, थोडागूळ आणि जायफळ पावडर घालून बारीक करा.
बारीक केलेले मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. अशा प्रकारे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवायचे मिश्रण तयार आहे.
आता हे मिश्रण चांगले एकजीव करून त्याचे मस्त बनवून घ्या.