शेवटचे मुघल शासक बहादूर शाह जफर यांची नात जगतंय असं आयुष्य

Oct 05,2024


मुघलांनी भारतावर सुमारे 200 वर्षे राज्य केलं. मुघलांचा भारतावर सर्व प्रकारे प्रभाव होता.


मुघल केवळ त्यांच्या युद्धकौशल्यासाठीच नव्हे तर त्यांच्या विलासी जीवनासाठीही प्रसिद्ध होते.


मुघल सुंदर गणिकेवर त्यांची धन संपत्ती लुटवायचे. पण या मुघलांची एक सून आज द्रारिद्र्यात आयुष्य घालवत आहे.


शेवटचे मुघल शासक बहादूर शाह जफर यांची नात सुलताना बेगम यांच्याविषय आम्ही बोलत आहोत. सुमारे 70 वर्षांच्या सुलताना यांच्या पतीचं निधन झालं.


सुलतानाचे पूर्वज अतिशय आलिशान राजवाड्यात राहायचे, पण मुघल शासकांच्या जीवनात तिला सुख नव्हतं. ती सध्या कोलकात्यातील झोपडपट्टीत आपलं आयुष्य व्यतित करत आहे.


सुलतानाला सरकारकडून फक्त 6000 रुपये पेन्शन मिळते. उदरनिर्वाहासाठी सुलताना कोलकात्यात हावडा ब्रिजखाली चहा आणि पकोडे विकते.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुल्तानाला एकदा सरकारने 50 हजार रुपये आणि घर दिले होते, मात्र काही लोकांनी ते हिसकावून घेतले.

VIEW ALL

Read Next Story