50 विहिरींच्यावर ताजमहल बांधला गेलाय हे ऐकून तुम्ही हैराण व्हालं.
यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्यामुळे 100 वर्षानंतरही ताजमहल मजबूतीने उभा आहे.
ताजमहलच्या पायाशी 50 विहिरी आहेत. यावर संपूर्ण ताजमहलच वजन आहे.
या विहिरीमध्ये आबनूस आणि महागोईची लाकडे टाकण्यात आली होती. ज्यांना यमुनेच्या पाण्यामुळे ओलावा मिळत होता.
ही लाकडे जितकी ओली राहतील तितकी मजबूत राहतील. त्यामुळे ताजमहल यमुनेच्या किनारी बनवण्यात आला.
आर्कियोलॉजिस्ट एन के भटनागर यांच्यानुसार, ताजमहलच्या मुळाशी असलेल्या विहिरींना सतत पाण्याची गरज असते.
ओलाव्यामुळे यमुनेचे पाणी ताजमहलच्या विहिरींमध्ये जाते. ज्यामुळे मुळाशी असलेली लाकडे मजबूत राहतात.
मुघल बादशहाने 1632 साली ताजमहल निर्माणाचे कार्य सुरु केले. ही वास्तू बनण्यास 22 वर्षे लागली.