झोमॅटोचे सीईओ आणि को-फाऊंडर दीपिंदर गोयल चक्क Zomatoचं टीशर्ट घालून डिलिव्हरी एजंटची भूमिका पार पाडली
दीपिंदर गोयल यांच्याबरोबर त्यांची पत्नी Grecia Munoz हिनेही झोमॅटोचं टीशर्ट परिधान करुन पतीला साथ दिली.
ग्रेसिया यांनी नुकतंच आपलं नाव बदलून Gia Goyal असं केलं आहे. दीपिंदर यांनी इन्स्टाग्रामवर डिलिव्हरी करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
दीपिंदर गोयल यांनी फोटोबरोबरच एक पोस्टही लिहिली आहे. यात त्यांनी म्हटलंय काही दिवसांपूर्वी ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी बाहेर गेलो होतो'
दिपिंदर यांनी शेअर केलेल्या फोटोत ते बाईक चालवताना दिसत आहेत. तर एका फोटोत फोनवरुन बोलताना दिसत आहेत.
एका खासगी कंपनीत दीपिंदर गोयल यांनी जेवण ऑर्डर केलं. त्यानंतर त्यांनी तिथल्या ग्राहकांशी गप्पाही मारल्या.
काही लोकांनी दीपिंदर यांच्याबरोबर फोटोही काढले. लोकांनी दीपिंदर गोयल यांच्या या कार्याचं भरूप कौतुक केलं आहे.