प्रेग्नंट असताना डिहायड्रेट असणं धोकादायक असू शकते. याकाळात महिलांनी हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं आहे. पाण्यासोबत, फ्रेश ज्यूस आणि नारळ पाणी सतत पीत रहा.
करवा चौथच्या उपवासा दरम्यान, प्रेग्नंट महिलांना दमल्यासारखे वाटू शकते. त्यांना चक्कर येऊ शकतात. त्यामुळे एनर्जी राहण्यासाठी जेवढा जमेल तेवढा आराम करा.
एखाद्या महिलेला डायबिटीज आहे तर प्रेग्नंसी दरम्यान, तिनं सतत ब्लड शूगर लेव्हल तपासत रहायला हवं. त्यामुळे उपवास धरल्यास तर ब्लड शूगर लेव्हल हाय होण्याची शक्यता असते.
ड्राय फास्टिंगमध्ये पाणी आणि खाणं दोन्हीही टाळतात. प्रेग्नंट असताना हे योग्य नाही. त्यामुळे तुमच्या बाळावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ड्रायफास्टिंग करू नका.
प्रेग्नंट महिलांना जर उपवास करायचा असेल तर त्याआधी हेल्दी म्हणजेच प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिननं भरपूर असलेल्या गोष्टींचे सेवन करा. त्यामुळे उपवासा दरम्यान, तुमच्यात ताकद राहिल.
या दरम्यान, तुमची तब्येत बिघडत असेल तर तुम्ही त्याकडे लगेच लक्ष द्या. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा उलटीसारखं वाटतं असेल तर उपवासा दरम्यान, तुम्ही काही खाऊ शकता.
प्रेग्नंट महिलेला जर करवा चौथचा उपवास ठेवायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. कारण हे तुमच्या मुलांसाठी सुरक्षित आहे की नाही याची माहिती मिळवणं गरजेचं आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)