मोबाईल ही गरज नसून व्यसन झालं आहे हा 'मुंबई-पुणे-मुंबई'मधील संवाद आज आपल्याला अनेकांबद्दल प्रत्यक्षात अनुभवायला मिळतोय.
अनेक महिला आपला स्मार्टफोन पर्समध्ये ठेवतात. मात्र पुरुष अनेकदा फोन पॅण्टच्या खिशात ठेवतात. मात्र ही सवय धोकादायक आहे.
बहुतांश पुरुष हे त्यांच्या पॅण्टच्या खिशातच आपला मोबाईल ठेवतात. पुरुषांना मोबाईल शर्टच्या खिशात ठेवायला आवडत नाही.
खिशातून मोबाईल पडण्याची भीती असल्याने जवळपास बहुतांश पुरुष पॅण्टच्या खिशातच मोबाईल ठेवतात. मात्र फार कमी लोकांना यामागील धोक्यांची कल्पना असते.
स्मार्टफोन कोणत्या खिशात ठेवावा हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. कारण स्मार्टफोन पॅण्टच्या खिशात ठेवण्याच्या सवयीमुळे गंभीर आजाराला तुम्ही बळी पडू शकता.
स्मार्टफोन वायरलेस नेटवर्कशी कनेक्ट होतो तेव्हा त्यामधून रेडिएशन निघतं. त्यामुळेच जेव्हा फोन शरीराजवळ ठेवतो तेव्हा शरीरावर या रेडिएशनचा परिणाम होतो.
मोबाईल जेव्हा पॅण्टच्या खिशात असतो तेव्हा तो बराच वेळ शरीराच्या संपर्कात असतो. त्यामुळे पुरुषांना नपुंसकत्व येऊ शकतं. तसेच यामुळे हाडंही कमकुवत होतात.
फोन कोणत्या खिशात ठेवावा ज्यामुळे रेडिएशनचा धोका कमी होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे तुमच्या शरीरातील नाजूक अवयवांपासून स्मार्टफोन दूर राहील असं पहावं.
स्मार्टफोन खिशात ठेवणं जेवढं टाळता येईल तितकं बरं. स्मार्टफोन शक्यतो बॅगमध्ये ठेवण्यास प्राधान्य द्या.
फोन खिशात ठेवायचा असेल तर तो मागील बाजूच्या खिशात ठेवावा. ते आरोग्याच्या दृष्टीने त्यातल्या त्यात फायद्याचं ठरतं.
फोन खिशात ठेवतानाही फोनची स्क्रीन खिशाच्या बाहेरील बाजूस असेल याची काळजी घ्यावी. यामुळे शरीरावर रेडिएशनचा कमीत कमी परिणाम होतो.