थंडीच्या दिवसांत सर्दी-खोकल्याचा त्रास अधिक बळावतो. अशासाठी सतत डॉक्टरची औषधे घेण्यापेक्षा घरगुती उपाय करुन पाहा.
घसा दुखत असेल किंवा खोकला बळावला की आले-पाक वडी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हल्ली बाजारात साखरेचा आले-पाक मिळतो त्याचा फारसा फायदा होत नाही.
अशावेळी घरच्या घरी गुळ घालून आलेपाक वडी कसा बनवायचा याची सोप्पी रेसिपी जाणून घ्या.
आले १ वाटी, गुळ १ वाटी, तूप- १ चमचा, १ कप दूध
सर्वप्रथम आले स्वच्छ धवून त्याची साले काढून घ्या व नंतर आल्याचे बारीक तुकडे करुन मिक्सरमध्ये वाटून करुन घ्या. आलं वाटून घेतल्यानंतर गुळ चिरुन मिक्सरमधून काढून घ्या
आता एका कढाईत तूप टाकून त्यात आल्याचे व गुळाचे मिश्रण चांगले परतवून घ्या. हे मिश्रण कढाईला चिकटणार नाही याची काळजी घ्या
मिश्रण थोडे घट्ट झाले की अर्धा कप दूध घालून पुन्हा एकदा एकजीव करुन घ्या. त्यानंतर हे मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करुन घ्या
मिश्रण गरम असतानाच एका ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण एकसारखे पसरवा व वडीचे काप पाडून घ्या. गार झाल्यानंतर एका डब्यात या आलेपाकच्या वड्या काढून ठेवा