आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 18 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानदरम्यान खेळवण्यात आला. बंगळुरुमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पण पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमचा निर्णय संघाला चांगलाच महागात पडला. ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनी तुफान सुरुवात केली.
मिचेल मार्शआणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने पहिल्या विकेटसाठी रेकॉर्डब्रेक भागिदारी केली. या दोघांनी तब्बल 259 धावांची पार्टनरशिप केली.
दोघांनीही शतक झळकावलं. डेव्हिड वॉर्नरने 163 धावा तर तर मिचेल मार्शला 121 धावा फटकावल्या. 10 धावांवर असताना वॉर्नला जीवदान मिळालं आणि तेच पाकिस्तानला महागात पडलं.
वॉर्नरने या जीवदानाचा चांगलाच फायदा उचलला, वॉर्नरने यंदाच्या वर्ल्ड कपमधलं पहिलं ततर पाकिस्तानविरुद्ध चौथं शतक ठोकलं
वॉर्नर आणि मार्शने आणखी एक इतिहास रचला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारी ऑस्ट्रेलियाची पहिली सलामीची जोडी ठरली आहे.
या आधी हा विक्रम शेन वॉट्सन आणि ब्रॅड हॅडिन यांच्या नावावर होता. 2011 च्या विश्वकप स्पर्धेत या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 183 धावा केल्या होत्या.