पावसाळ्यात दमट वातावरण असल्याने घरातल्या बऱ्याच गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं.
पावसाळ्यात साठवणीच्या वस्तूंपासून ते खराब होणारे कपडे,गरम मसाले आणि लेदरच्या वस्तू खूपच त्रासदायक वाटतं.
पावसाळा आणि बुरशी यांच एक अतूट नातं आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे कपडे न वाळण्याची समस्या असते. कित्येकदा कपडे ओलो राहतात ज्यामुळे त्यांना बुरशी लागते. यामुळे बुरशीचे डाग कपड्यांवर तसेच राहतात.अशा वेळी बुरशीचे डाग घालवण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो.
पावसाळ्यात स्वयंपाकघरात डाळींपासून मसाल्यापर्यंत सर्वच गोष्टी खराब होऊ लागतात.अशावेळी मसाले खराब होऊ नयेत म्हणून हलके गरम करून काचेच्या डब्ब्यात ठेवावेत.
पावसाळ्यातील दमट हवामानामुळे बहुतेकदा लेदरच्या वस्तूंना बुरशी लागण्याची शक्यता असते. यासाठी वस्तू हवेशीर जागी ठेवाव्यात. पावसाचे पाणी आत येत असेल तर अशा ठिकाणी लेदरचा वस्तू ठेवणं टाळा.
वातावरणातील आर्द्रतेमुळे आणि पाण्याशी संपर्क होत असेल तर लाकडी वस्तू खराब होण्याची शक्यता असते. यासाठी साफसफाई करताला ओल्या कपड्याचा वापर टाळा. तर त्याऐवजी मऊ आणि कोरड्या कपड्याचा वापर करा.