तुम्हाला माहितीये का रात्री तुमचं शरीरचं देतं Diabetes चे 6 संकेत; 'या' गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका

दिवसोंदिवस वाढतेय संख्या

मधुमेह म्हणजेच डायबेटीजची समस्या ही हल्ली आरोग्य विषय समस्यांपैकी फार सामान्य समस्या झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे.

10 कोटींहून अधिक रुग्ण

भारतामध्ये डायबेटीजचे 10 कोटींहून अधिक लोकांना मधुमेहाची समस्या आहे.

शरीर देतं विशेष संकेत

मधुमेहाचा त्रास असेल तर रात्री झोपताना किंवा झोपेदरम्यान शरीर काही ठराविक संकेत आपल्याला देत असतं. हे संदेश कोणते ते पाहूयात...

श्वास घ्ययाला त्रास

रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असेल तर झोपताना श्वास घ्यायला त्रास होतो. याला स्लीप एपनिया असं म्हणतात.

वारंवार लघवीला लागणे

रात्री वारंवार लघवीला लागणे हा मधुमेहाचा इशारा मानला जातो.

पाण्याचं प्रमाण कमी होतं

वारंवार लघवीला गेल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि सतत तहान लागते.

सामान्य वाटणाऱ्या या तीन गोष्टीही इशाराच

थकवा, डोकेदुखी, एकाग्रता नसणे ही सुद्धा मधुमेह असल्याची प्राथमिक लक्षण मानली जातात.

अधिक घाम येणे

रात्री अधिक घाम येणे त्यातही थंडीच्या दिवसातही अधिक घाम येणे हे मधुमेहाचं लक्षण मानलं जातं.

मज्जासंस्थेवर परिणाम

रक्तात साखर जास्त असेल तर त्याचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. याला डायबेटीक न्यूरोपॅथी असं म्हणतात.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story