सुक्यामेव्यामध्ये आढळणारा एक कमालीचा पोषण तत्त्वं असणारा घटक म्हणजे काजू.
कोकणचा मेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजूचे शरीराला अनेक फायदे होतात.
मुळात काजू हे एक असं फळ आहे, जे प्रत्येक स्वरुपात खाण्याजोगं असतं. त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषत: या काजूचं सेवन केलं जातं. अशा या काजूला तितकीच मोठी किंमत सुद्धा मिळते.
बाजारात काजूला जितकी मागणी आहे तितक्याच मोठ्या प्रमाणात त्यात भेसळही आढळते.
अस्सल काजू कधीच पूर्ण पांढरा नसतो. तुम्ही जर काजू खरेदीसाठी गेलात तर ही बाब कायम लक्षात ठेवा.
चांगल्या प्रतीच्या काजूला एक सुगंध येत असतो. हा सुगंध लगेचच लक्षात येतो.