YouTube हे अनेकांसाठी फक्त मनोरंजनाचं साधन आहे. अनेकजण याचा वापर व्हिडीओ पाहण्यासाठी करतात. तर काहींसाठी ते उत्पन्नाचं माध्यम आहे.
YouTube एक व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असून, जिथे व्हिडीओ बनवून तुम्ही पैसे कमावू शकता. पण यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
सर्वात आधी युट्यूब मोनेटायजेशनबद्दल जाणून घ्या. यासाठी तुमच्याकडे 1000 सबस्क्रायबर्स, एक वर्षात 4000 तासांचा वॉच टाइम किंवा 90 दिवसांत शॉर्ट्सवर 1 कोटी व्ह्यूज हवेत.
याशिवाय चॅनेल मेंबरशिप, शॉपिंग, सुपर चॅट, सुपर स्टिकर आणि सुपर थँक्ससारख्या सर्व्हिससाठी तुमच्याकडे किमान 500 सबस्क्रायबर्स हवेत.
यासाठी 90 दिवसांत तुम्हाला 3 कंटेंट पब्लिक अपलोड केलेले असावेत. गेल्या 1 वर्षात तुमच्या व्हिडीओंवर 3000 तासांचा वॉच टाइम किंवा 90 दिवसांत शॉर्ट व्हिडीओंवर 30 लाख व्ह्यूज असण्याची गरज आहे.
याशिवाय चॅनेलवर 365 दिवसांमध्ये 4000 तासांचा पब्लिक वॉच असायला हवा. किंवा शॉर्ट व्हिडीओवर 90 दिवसांत 1 कोटी व्ह्यूज हवेत.
तुम्ही जर या सगळ्या अटी पूर्ण केल्या तर YouTube च्या माध्यमातून कमाई करु शकता. याशिवाय तुमचा कंटेंट, त्यावर येणाऱ्या व्ह्यूजवर आधारित असतं.