मॉर्डन रामायण म्हणून या चित्रपटाला बनवण्यात आलं मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली नाही.
'द केरला स्टोरी' हा चित्रपट केरळच्या 32 हजार मुलींच्या कथेवर आधारीत असल्याचं म्हटलं होतं. पण ती फक्त 3 महिलांची स्टोरी होती की कशा प्रकारे त्यांच्या इच्छेविरोधात जाऊन त्या ISIS कॅम्प जॉइन करतात.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असला तरी देखील असं म्हणता येणार नाही की हा चित्रपट संपूर्णपणे सत्य घटनेवर आधारीत होता किंवा संपूर्ण चुकीची माहिती होती.
कार्तिक आर्यनचा 'शेहजादा' हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या Ala Vaikunthapurramuloo या चित्रपटावर आधारीत आहे. तर या चित्रपटात कार्तिक असूनही त्याचं चार्म हे प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचू शकलं नाही.
सलमान खानच्या या चित्रपटातील गाणी किंवा त्याचं पटकथा ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाहीत.
टायगर श्रॉफचा 'गणपत' हा चित्रपट कधी थिएटरमध्ये आला आणि कधी बाहेर पडला हे कळलंच नाही. यात असलेल्या वाईट व्हिएफेक्स आणि पटकथा चित्रपटाच्या अपयशाचं कारण असल्याचं अनेक प्रेक्षकांचे म्हणणे होते. (All Photo Credit : Social Media)