वेळी-अवेळी जेवणाच्या वाईट सवयीमुळं आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात.
खराब मेटाबॉलिजम, अपचन, थकवा, कफ, ताप यासारखे आजार निर्माण होऊ शकतात
आज आपण मुगाचे सुप कसे बनवावे याची रेसिपी आपण जाणून घेऊया. यामुळं अनेक आजारांवर मात करता येते.
मुगाच्या सुपाला मुद्रा युशा नावानेही ओळखले जाते. डॉ. दीक्षा भावसार यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
हे सूप बनवण्यासाठी सगळ्यात पहिले अर्धा कप मूग स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर दोन लीटर पाण्यात भिजत घाला.
तीन तासांनंतर पाण्यात मूग पहिली उकळी येईपर्यंत शिजवून घ्या. उकळी घेताना फेस काढत राहा. त्यानंतर मऊ होईपर्यंत शिजवून घ्या
पूर्णपणे मऊ झाल्यानंतर त्याच चिमूटभर काळी मिरची पावडर, धणे पावडर, जीरा पावडर आणि मीठ टाकून एकजीव करुन घ्या
त्या नंतर सर्व जिन्नस एकजीव करुन घ्या आणि 1-2 मिनिटे गॅसवर ठेवून एक उकळी घ्या. तुमचे सूप तयार आहे.