महाकुंभातील टेंट सिटीममध्ये एका खोलीचं भाडं किती?

Pooja Pawar
Jan 11,2025


13 जानेवारी पासून उत्तर प्रदेशच्या प्रयागराज महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.


महाकुंभात देशविदेशातील करोडोंच्या संख्येने भाविक या महाकुंभमेळ्यात सहभागी होतील.


महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी IRCTC ने टेंट सिटी तयार केली आहे. ज्याला महाकुंभ ग्राम असे नाव देण्यात आले.


टेंट सिटी परिसर हा सेक्टर 25, एरेल रोड, नैनी, प्रयागराज येथे तयार करण्यात आलेला आहे. जेथे भाविकांच्या लहान-मोठ्या गरजा लक्षात घेऊन त्याच्या राहण्याची व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे.


महाकुंभ ग्राम येथे दोन प्रकारच्या खोल्या असून यात सुपर डिलक्स आणि विला यांचा समावेश आहे.


दोन व्यक्तींसाठी सुपर डिलक्स खोल्यांचं भाडं हे 16 हजार 200 असून विलासाठी 20 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच यावर 18 टक्के जीएसटी वेगळा घेतला जाईल.


टेंट सीटीमध्ये राहणाऱ्या भाविकांना सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळच जेवण दिलं जाईल.


सुपर डिलक्स खोलीत तुम्ही अतिरिक्त बेड लावता तर त्यासाठी तुम्हाला 5 हजार मोजावे लागतील तर विलामध्ये अतिरिक्त बेड लावायचा झाल्यास 7 हजार मोजावे लागतील.


टेंट सिटीमधील खोल्यांचं बुकिंग तुम्ही IRCTCच्या अधिकृत वेबसाईटवरून करू शकता.

VIEW ALL

Read Next Story