खारीसारखे खुसखुशीत तळणीचा मोदक, 10 दिवस आरामात टिकतो

राज्यातील विविध भागात मोदक बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते

काही ठिकाणी गव्हाचे पीठ वापरून तळणीचे मोदक बनवले जातात.

तळणीचे मोदक खुसखुशीत व खारीसारखे होतील, फक्त ही रेसिपी वाचा

साहित्य

रवा, मैदा/ गव्हाचे पीठ, तेल, मीठ, मोदकाचे सारण

कृती

सर्व प्रथम रवा आणि मैदा मिक्स करुन त्यात कडकडीत तूपाचं मोहन घालून घ्या. नंतर पीठ चांगलं रगडून घ्या आणि थोडं पाणी घालून सैलसर मळून घ्या. व अर्धा तास ठेवून द्या.

आता एका वाटीत एक चमचा तूप व तीन चमचे कॉर्नफ्लोवर घेऊन पेस्ट करा. त्यानंतर चपातीप्रमाणे पोळ्या लाटून घ्या. आता या पोळीला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून त्यावर दुसरी पोळी टाका. अशाप्रमाणे तीन पोळ्या एकामेकांवर लावून घ्या

आता या पोळीची गुंडाळी करुन चांगलं मळून घ्या व लहान गोळे करा. या गोळ्याची मोदकासाठी पारी लाटून घ्या.

त्यानंतर पारीमध्ये सारण भरुन मोदकाच्या कळ्या काढून घ्या. चांगला मोदकाला सुबक आकार दिल्यानंतर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

हे तळणीचे मोदक आरामात ८ ते 10 दिवस टिकतात. तसंच, खारीसारखे खुसखुशीतही होतात.

VIEW ALL

Read Next Story