विज्ञानाने खूप प्रगती केल्यामुळे माणसाने आता थेट अंतराळापर्यंत झेप घेतली आहे.
अंतराळाशी निगडित असलेली अनेक रहस्य लोकांना अवाक करून सोडतात. या रहस्यांविषयी अनेकांना कुतूहल वाटते.
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की अंतराळात एवढे सूर्य असूनही तेथे अंधार का असतो? तेव्हा याची काही कारण जाणून घेऊयात.
प्रकाश पसरवण्यासाठी वातावरण नाही : अंतराळात प्रकाश विखुरण्यासाठी वातावरणाचा अभाव आहे. जसे पृथ्वीवर रेले स्कॅटरिंगमुळे आकाश निळे दिसते.
अंतराळात आकाशगंगा, तारे आणि काही प्रकाश स्रोतां व्यतिरिक्त अवकाश जवळजवळ रिक्तच आहे.
अंतराळात प्रकाश परावर्तित करण्यासाठी किंवा पसरवण्यासाठी तेथे कोणतेही कण नाहीत. ज्यामुळे अंतराळात अंधार असतो.
अंतराळासह प्रकाशाची घनता कमी होते. सूर्य खूप दूरवर असल्याने त्याचा प्रकाश मोठ्या अंतरावर पसरतो.
माणसांच्या डोळ्यांना पाहण्यासाठी विशिष्ट प्रमाणात प्रकाश पाहणे आवश्यक असते. अंतराळातील गडद काळ्या ठिकाणी डोळ्यांना प्रकाश शोधण्यासाठी पुरेसा प्रकाश नसतो.
अंतराळा हे अमर्याद आहे ते एकसारखे नाही. त्यामुळे दूरवरच्या ताऱ्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नाही.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)