डायबिटीज रुग्णांची दिवाळी होणार गोड! आनंदानं खा 'ही' मिठाई

मधुमेहींसाठी शुगर-फ्री काजू कतली बनवण्याचं साहित्य

1 कप काजू (ग्राइंड) 5-6 चमचे शुगर फ्री साखर 4-5 केसर 1/2 टीस्पून वेलची पावडर आवश्यकतेनुसार पाणी

पद्धत

एका सॉसपॅनमध्ये पाणी, शुगर फ्री आणि केसर घाला.

वेलची पूड

शुगर फ्री साखरेचा पाक तयार होई पर्यंत मिश्रण हलवा. त्यानंतर त्यात वेलची पूड घाला.

आता महत्त्वाचा पदार्थ काजू

मिश्रण घट्ट झाले की गुठळ्या होऊ नयेत म्हणून ते ढवळत असताना हळूहळू काजू घाला. आता मंद आचेवर शिजवा.

कसं समजाल तयार झाली की नाही कतली

मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. जेव्हा हे मिश्रण कढईला तेल सोडू लागेल तेव्हा एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी पसरवून ठेवा.

मग द्या हिऱ्याचा आकार

एकदा ते पूर्णपणे थंड झाल्यावर, हिऱ्याच्या आकाराचे तुकडे करण्यासाठी चाकू वापरा.


अशा प्रकारे घरीच बनवा शूगर -फ्री काजू कतली. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story