काजोलची आई तनुजा यांच्या हसण्याला कंटाळून दिग्दर्शकानं सेटवरच लगावली कानशिलात

तनुजा यांचं करिअर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा यांची चित्रपटसृष्टीत दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द आहे.

चित्रपटानं लगावली कानशिलात

‘हमारी याद आएगी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक किदार शर्मानं तनुजाला कानशिलात लगावल्याची घटना घडली होती.

काय होते कारण

कानशिलात लगावल्याचे कारण म्हणजे एका विशिष्ट सीनमध्ये तनुजा यांना रडायचे होते, पण त्याऐवजी त्यांना हसू अनावर होत नव्हते.

तनुजा यांच्या हसण्याला दिग्दर्शक कंटाळले

भावनिक सीन्स दरम्यान, तनुजा यांच्या हसण्याने निराश झालेल्या दिग्दर्शक किदार शर्मा यांनी त्यांना सेटवर सगळ्यांसमोर कानशिलात लगावली.

त्यानंतर तनुजा यांनी केली या व्यक्तीकडे तक्रार

या घटनेनंतर तनुजा यांनी रडत रडत सेट सोडला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांची आई शोभना यांच्याकडे तक्रार केली.

आईनं लगावली कानशिलात

ही गोष्ट ऐकून तनुजा यांची आई शोभना यांनी देखील आपल्या मुलीला कानशिलात लगावली. यामुळे तनुजा यांना सेटवर परत येण्यास प्रवृत्त केले आणि दिग्दर्शकाला कळवले की त्या आता या सीनसाठी रडण्यास तयार आहेत.

तनुजा यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट

'हमारी याद आएगी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी, तनुजा यांच्या अभिनयातील करिअरसाठी हा एक टर्निंग पॉइंट ठरला आणि अखेरीस त्यांना इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळाली. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story