10 वर्षाच्या पोराने कुत्र्याप्रमाणे गळ्यात पट्टा घालून वाघाला फिरवलं; नेटकरी सैरभैर

सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हसवणारे तर काही व्हिडीओ भीतीदायक असतात.

असाच एक भीतीदायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी युट्यूबर नौमान हसनने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत 10 वर्षांचा मुलगा वाघाला चक्क पाळीव कुत्र्याप्रमाणे गळ्यात पट्टा घालून फिरवताना दिसत आहे.

हसन अनेकदा धोकादायक पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतो.

हसनकडे फक्त वाघच नाही तर विषारी साप आणि मगरही आहे.

व्हिडीओत दिसणारा मुलगा हा त्याचा भाचा असल्याचं बोललं जात आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

जनावरांशी असं खेळणं जीवघेणं असून, हे योग्य नाही अशी खंत नेटकऱ्यांनी मांडली आहे.

VIEW ALL

Read Next Story