मुंबईपासून सहज जाता येतील तसेच एक ते दोन दिवसांचा प्लॅन करता येईल अशी 10 हटके बाईक राईड डेस्टीनेशन्स पाहूयात...
मुंबई लोणावळा हा मार्ग बाईकर्ससाठी अगदी उत्तम आहे. या मार्गावरील सरासरी वेग 80 किमी प्रतितास इतका आहे. मार्गावरील घाटात 45 च्या आसपास चढ उतार आहेत.
नाशिकच्या आलीकडे असणारं इगतपुरी हे 120 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागतो. नैसर्गिक सौंदर्य आणि भरपूर हटके रिसॉर्ट इथं आहेत. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात इथं बायकर्सची मोठी गर्दी असते.
600 किलोमीटरचा ही खऱ्या अर्थाने ड्रीम रोड ट्रीप होऊ शकते. मात्र यासाठी मोठी सुट्टी हवी. या मार्गावरील 12 तासांची ड्राइव्ह करणाऱ्यांची वार्षिक संख्या 35 लाखांहून अधिक आहे.
शिर्डीला दरवर्षी 75 हजार बाईकर्स भेट देतात. मुंबई ते शिर्डी हे अंतर 241 किलोमीटर इतकं आहे. या प्रवासासाठी 5 तास लागतात.
शनिवार रविवार बाईक राईडला जायचा विचार असेल तर तुम्ही मुंबईपासून 263 किमीवर असलेल्या महाबळेश्वरचा विचार करु शकता. रमत गमत गेला तरी 6 तासांत हा प्रवास पूर्ण होतो.
निसर्ग, नदी आणि हिरवळ पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही मुंबईपासून 120 किलोमीटरवर असलेल्या कोलाडला भेट देऊ शकता. इथं जाताना ताम्हणी घाटातून प्रवास करावा लागतो.
एका दिवसाच्या लाँग ड्राइव्हचा विचार करत असाल तर मुंबईपासून 80 किलोमीटर असलेल्या माथेरानमध्ये 2 तासात पोहचता येईल. या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचे पर्याय पर्यटक म्हणून उपलब्ध आहेत.
द्राक्षाचे मळे किंवा वाईनरी पाहण्याची हौस असेल आणि थोडं लांब जायचं असेल तर नाशिकच्या पर्यायाचा विचार करु शकता. 60 किमीच्या वेगाने निसर्गाचा आनंद घेत येऊन जाऊन 7 ते 8 तासांची ही जर्नी होऊ शकते.
मुंबई-अलिबागदरम्यानचं अंतर केवळ 95 किलोमीटर आहे. या मार्गावर निसर्गाचा आनंद घेत मस्त मोटरसायकल चालवता येईल.
मुंबईवरुन तुम्ही गुजरातच्या बाजूला जाण्याचा विचार करत असाल तर दीव-दमण उत्तम पर्याय आहे. 176 किलोमीटरचा हा प्रवास तुम्हाला 4 तासांमध्ये पूर्ण करता येईल.