भारताचा शेवटचा रस्ता तुम्ही कधी पाहिला आहे का? पहिल्यांदाच या रस्त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
तमिळनाडूच्या दक्षिण-पूर्वेस असलेल्या या रस्त्याचे नाव धनुषकोडी आहे. हा रामेश्वरम बेटाच्या किनाऱ्यावर वसलेला आहे
हा रस्ता भारत-श्रीलंकादरम्याची सीमा आणि देशातला शेवटचा रस्ता म्हणूनही ओळखला जातो, इथलं सौंदर्य मन मोहून टाकणारं आहे.
पर्यटकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. या रस्त्याचा आता एरिअल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ @mygovindia या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. भारताचा शेजारी देश श्रीलंका या रस्त्यावरुन सहज दिसतो.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत रस्ताचा ड्रोन व्ह्यू दाखवण्यात आला आहे. मधोमध रस्ता आणि तीन बाजूला अथांग समुद्र दिसतोय.
या व्हिडिओवर लोकांनी अनेक कमेंट केल्या आहेत. या रस्त्याचा आकार शिवलिंगासारखा असल्याचं एका युजरने म्हटलंय.