'ही' आहेत जगातील 8 सर्वात मोठी घरं, तर यापैकी 2 भारतात

Pooja Pawar
Jan 23,2025


आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार, गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठ्या घरांपैकी एक आहे. हा पॅलेस 700 एकरमध्ये पसरलेला असून यात 170 खोल्या आहेत.


'सराय' ज्याला तुर्कीचे व्हाईट हाऊस असेही म्हंटले जाते, हे जगातील मोठ्या घरांपैकी एक आहे. यात 1,000 पेक्षा जास्त खोल्या असून हे घर तब्बल 71 एकरमध्ये पसरलेले आहे.


ब्रुनेई या छोट्या देशात इस्ताना नुरुल इमानमध्ये सुमारे 50 एकर क्षेत्रफळ असून यात 1,788 खोल्या (257 स्नानगृहांसह), 5 स्विमिंग पूल आहेत.

अपोस्टोलिक पॅलेस

अपोस्टोलिक पॅलेस हे 40 एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेले असून हे पॅलेस सत्ताधारी पोपचे अधिकृत निवासस्थान आहे

क्विरिनल पॅलेस

रोममधील क्विरिनल पॅलेस व्हाईट हाऊस हे सुमारे 40 एकरात पसरलेले आहे. इटलीच्या अध्यक्षांच्या तीन अधिकृत निवासस्थानांपैकी हे एक आहे.

उम्मेद भवन पॅलेस

जोधपूरमधील उम्मेद भवन पॅलेस सुमारे 23 एकरमध्ये पसरलेला आहे. राजवाड्याचा एक भाग हॉटेलमध्ये बदलण्यात आलाय तर दुसरा भाग जोधपूरच्या राजघराण्याचं निवासस्थान आहे.


लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस 1837 पासून हे ब्रिटीश सार्वभौमांचे अधिकृत निवासस्थान आहे. हा पॅलेस सुमारे 19 एकरमध्ये पसरलेला आहे.

बिल्टमोर इस्टेट :

नॉर्थ कॅरोलिनामधील बिल्टमोर इस्टेट हे यूएस मधील सर्वात मोठे घर आहे, जे सुमारे 4 एकरात पसरलेले आहे. या घरात एकूण 35 बेडरूम, 43 स्नानगृहे आणि दोन मजली लायब्ररी देखील आहे.

VIEW ALL

Read Next Story