लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथे 66 व्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये रविवारी म्युझिकल स्टार्सनी उत्तम परफॉर्मन्स दिला. अनेक स्टार्सनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या संपूर्ण कार्यक्रमाने प्रेक्षकांना एक जबरदस्त अनुभव दिला.
मात्र या मेगा इव्हेंट दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे प्रत्येकजण विचारात पडला आहे. प्री-रेकॉर्डिंग सोहळ्यादरम्यान, रॅपर-गायक किलर माईकने तीन ग्रॅमी अवॉर्ड जिंकले, पण यादरम्यान असे काही घडले ज्याचा त्याने विचारही केला नसेल.
रॅपर आणि सामाजिक कार्यकर्ता किलर माईकने संगीत क्षेत्रातील सर्वात मोठे तीन पुरस्कार घेतले. ज्यामध्ये वीस वर्षांतील त्याचा पहिला पुरस्कार देखील आहे.
मात्र ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर रविवारी रात्री रॅपर किलर माइकला पोलिसांनी ताब्यात घेतले. किलर माइकच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
वयाच्या 20 व्या वर्षी मला वाटले की ड्रग डीलर बनणे योग्य आहे. 40 व्या वर्षी मी पश्चातापासह जगू लागलो. 45 व्या वर्षी मी रॅप करण्यास सुरुवात केली. 48 व्या वर्षी मी सहानुभूतीने भरलेला माणूस म्हणून मी इथं उभा आहे, असे माइक म्हणाला.
दरम्यान, ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर झालेल्या बाचाबाचीमुळे किलर माइकला अटक करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी माइकला पहाटे चार वाजता अटक झाल्याची माहिती दिली आहे.
रॅपर किलर माइकचे खरे नाव मायकेल सँटियागो रेंडर आहे. माइक हा प्रसिद्ध अमेरिकन रॅपर आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1975 रोजी अटलांटा, जॉर्जिया येथे झाला. (सर्व फोटो - AP)