जगातील सर्वात जुनं शहर भारतात अस्तित्वात असून, दरवर्षी या शहरात लाखो पर्यटक आणि भाविक भेट देतात. या शहराचं नाव आहे वाराणासी.
काशी हे या शहराचं आणखी एक नाव. असं म्हणतात की खुद्द भगवान शंकरानं हे शहर वसवलं.
बनारस, भोलेनाथ की नगरी, ज्ञान नगरी ही या शहराची आणखी काही नावं.
काशी म्हणजेच प्रकाश देणारं शहर. हे शहर ज्ञान आणि आस्थेचं केंद्र आहे. अविमुक्त म्हणूनही या शहराची ओळख.
ग्रंथांमध्ये या शहराची ओळख काशिका म्हणूनही प्रचलित आहे. हे शहर महाश्मशान म्हणूनही चर्चेत असतं.
मृत्यूपश्चात मिळणाऱ्या मोक्षामुळं या शहराला मुक्तिभूमी असंही नाव आहे. रुद्रावास, शिवनगरी, त्रिपुरारिराजनगरी, विश्वनाथ नगरी हीसुद्धा या शहराची नावं.