वैष्णवीचे वडील व्यापारी असून, आई एक शिक्षिका आहे. दोघांनीही मुलीच्या शिक्षणात काही कमी पडू दिलं नव्हतं. मुलीनेही IAS होत पांग फेडलं.
वैष्णवीने गोंडामधूनच आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीत गेली होती. तिथे लेडी श्रीराम कॉलेजातून तिने इकॉनॉमिक्समध्ये डिग्री मिळवली.
वैष्णवीने आपल्या यशाचं श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना दिलं आहे. वडिलांनी आपल्याला लहानपणी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावली होती, ज्याचा आपल्याला फायदा झाल्याचं वैष्णवी सांगते.
मला वृत्तपत्रातून जिल्हा दंडाधिकारी, एसपी काय काम करतात हे समजायचं. यातूनच मला पुढे जाऊन IAS होण्याची प्रेरणा मिळाली असं वैष्णवी सांगते.
UPSC मुलाखतीत वैष्णवीला विचारण्यात आलं होतं की, जर तुम्ही उद्या DM झालात आणि तेथील एसपीचं मागील दंडाधिकाऱ्यांशी जुळत नव्हतं अशा स्थितीत काय कराल?