रात्री जेवण कसं असावं याबद्दल प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. रात्रीचं जेवण हे सात वाजेच्या आता घ्यावं असं तज्ज्ञ सांगतात. त्याशिवाय जास्त तेल, मसाले आणि जड अन्न रात्रीच्या जेवण्यात टाळले पाहिजे. निरोगी आणि आनंदी जीवनासाठी रात्रीच्या जेवण्यात 7 पदार्थांचा समावेश करा.
फायबरयुक्त ओट्सचा रात्रीचा जेवण्यात समावेश करा. ओट्स खाल्ल्यामुळे शरीर मजबूत होतं आणि अनावश्यक भूक लागत नाही.
रात्रीच्या जेवण्यात मूग डाळ चिल्ला हे उत्तम आहे. यातून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. शिवाय ते पचण्यास हलक असतं.
रात्री जेवण्यात साबुदाणा खिचडी खूप चांगला पर्याय मानला जातो. खिचडीने पोट भरल्यासारखं वाटतं.
रात्री डाळ चपाती खाणे हा एक चांगला आहे. हे खाल्ल्याने फायबर आणि प्रोटीन दोन्ही तुम्हाला मिळतं.
6 कमी कॅलरीज आणि आवश्यक पोषण तत्वासाठी बदामाचं दूध रात्री घेणं फायदेशीर ठरतं.
अनेक पोषकतत्वांनी युक्त अशी केळी वजन वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी खाल्ला जातो. यात फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळतं.
पनीर खाणे हे आरोग्य राखण्यास आणि भरपूर प्रथिने मिळवण्यासाठी बेस्ट आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)