Kartiki ekadashi : विठ्ठलाला तुळसच का वाहतात? जाणून घ्या यामागचं कारण
विठ्ठलाला भक्तांसमवेत आणखी एक प्रिय गोष्ट म्हणजे तुळस. पण, देवाला तुळसच का वाहतात हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
तुळस लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी ही श्री विष्णूंची अर्धांगिनी आहे. विठ्ठलही विष्णूचच रुप. त्याचमुळं ही तुळ, अर्थात लक्ष्मीच त्यांच्यासमवेत सदैव असते अशी धारणा आहे.
अशीही धारणा आहे की तुळशीमध्ये श्रीविष्णूची स्पंदनं आकर्षिक करण्याची उर्जा आहे. त्यामुळं तुळस वाहिल्यानं श्री विठ्ठल अर्थात विष्णूची मूर्ती जागृत होते.
तुळशीमध्येच विष्णू- लक्ष्मीचा वास असल्यामुळं तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणाऱ्या चैतन्यानं मूर्तीचं चैतन्य उठून येतं आणि भक्तांवर देवाची कृपा राहते असाही अनेकांचाच विश्वास.
असं म्हटलं जातं की, विठ्ठलाच्या छातीशी असणारा तुळशीहार मूर्तीतील विष्णूरुपाच्या क्रियाशक्तीला चालना देतो, म्हणून विठ्ठलाला तुळस वाहतात.
(वरील माहिती सर्वसामान्य धारणा आणि समजुतींवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )