22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरामध्ये राम लल्लांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
देशासह जगभरातील राम भक्तांमुळे आनंदाचे वातावरण आहे.
देशविदेशातील मोठ्या आणि मानाच्या व्यक्तींची या सोहळ्यासासाठी उपस्थिती असणार आहे.
22 जानेवारीला मंत्रोच्चारांसह यथासांग पूजेनंतर रामलल्ला त्यांच्या स्थानी विराजमान होणार आहेत.
राम मंदिरात आरती पाससाठी बुकींग सुरु झाली आहे.
दिवसातून 3 वेळा आरती केली जाणार आहे.
पण सर्वसामान्यांना रामललाचे दर्शन कधीपासून मिळणार आहे?
सर्वसामान्य जनतेसाठी दुसऱ्या दिवशी दर्शन सुरु होणार आहे.
23 जानेवारीपासून सर्वसामान्य जनता रामललाचे दर्शन घेऊ शकणार आहे.
तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटवर आरती आणि इतर तपशील तपासता येणार आहे.