मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते.

सई ताम्हणकरने नुकतंच तिच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षांबद्दल भाष्य केले.

सईने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत तिला कसा जोडीदार हवा? याबद्दल सांगितले आहे.

"मला असं वाटतं की शोधून सुध्दा काही तरी उरलंय, अशी व्यक्ती पाहिजे."

"मी 60 वर्ष जर त्या व्यक्तीबरोबर राहिले तरी त्याचे नवीन गुण समोर आले पाहिजेत."

"तुम्ही त्याच्याशी काहीही बोलू शकता, असा व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवा."

"माझं असं निरीक्षण आहे की, लग्न झालेले मुलं-मुली आपल्या जोडीदारासमोर वेगळे असतात आणि मित्र-मैत्रिणींसमोर वेगळे वागतात, हे मला अजिबात आवडत नाही."

"शिजतं ते दिसतं हे सगळीकडे असावं. त्याबरोबरच प्रत्येक नात्यात स्पेस दिला पाहिजे. त्यामुळे एक ओढ जिवंत राहते."

"एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्याआधी आपलं एक जग असतं. त्यामुळे ती व्यक्ती आल्यानंतरही ते जग कायम राहिलं पाहिजे."

"या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे जोडीदार", असे सई ताम्हणकरने म्हटले.

दरम्यान सई ताम्हणकर ही 2013 मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीबरोबर लग्नबंधनात अडकली होती.

पण सईचे लग्न फक्त दोन वर्ष टिकले. त्या दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला.

VIEW ALL

Read Next Story