तुम्हालाही अशी स्वप्न पडतात का? जाणून घ्या याचा नेमका अर्थ काय?

प्रत्येकाला झोपल्यावर स्वप्न पडतात, स्वप्न पडणं ही सामान्य गोष्ट आहे.

पण तुम्हाला ठाउक आहे का ? आपल्याला पडणारं प्रत्येक स्वप्न काही न काही संकेत देत असतं.

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी भविष्यात घडणाऱ्या शुभ अशुभ गोष्टींचे संकेत देतात.

चला तर पाहुया आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा नक्की काय अर्थ होतो.

स्वप्नात पाउस पाहणे.

स्वप्नात पाउस पडताना दिसणं ही शुभ मानलं जातं. आपल्याला आर्थिक फायदा होणार असल्याचं दिसून येतं.

स्वप्नात गुलाब दिसणं

स्वप्नशास्त्रानुसार गुलाब दिसलं तर शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ आपल्यावर लक्ष्मीची कृपा होणार आहे असा होतो.

स्वप्नात स्वतःला गरीब पाहणं

जर तुम्ही स्वतःला गरिब व्यक्ती म्हणून पाहत असाल तर याचा अर्थ तुमच्यावर आर्थिक संकट येणार आहे. पण स्वप्नशास्त्रानुसार तुमच्यावरील सर्व आर्थिक संकंट दूर होउन तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहे.

स्वप्नात पोपट पाहणे

याचा अर्थ असा होतो की, लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. यामुळे तुमच्या जीवनात सुख, समाधान नांदणार आहे.

स्वप्नात पैसे पाहिल्यावर काय होतं

स्वप्नात पैश्यांची देवाणघेवाण होणं म्हणजे लवकरच तुमचं पैशांच गणित सुटणार असुन तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे.

स्वप्नात मुंग्या दिसणे

येत्या काळात तुमची सर्व कामे यशस्वी होतील. एखादं काम खूप दिवसांपासून रखडलं असेल तर ते पूर्ण होईल आणि अडकलेले पैसे लवकरच परत मिळतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story