भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे क्रिकेटमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे.

22 डिसेंबर 2020 रोजी दोघं विवाहबंधनात अडकले होते.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असून, नेहमी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात.

आशिय कप आणि वर्ल्डकप स्पर्धेसाठी चहलची निवड करण्यात आलेली नसून, यानंतर त्याने सोशल मीडियावरुन अप्रत्यक्षपणे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

दरम्यान, नुकतंच धनश्रीने इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

पत्नी धनश्रीने शेअर केलेल्या या फोटोंवर चहलनेही कमेंट केली आहे.

'माझा ताजमहल' अशी कमेंट चहलने पत्नीच्या फोटोवर केली आहे.

वर्ल्डकपमध्ये संधी नाकारण्यात आल्यानंतर चहलने इंग्लंडमधील केंटसह करार केला आहे. यानंतर धनश्रीने त्याच्यासाठी पोस्ट शेअर केलीहोती.

युजवेंद्र चहलने 72 एकदिवसीय सामन्यांमधे 121 विकेट्स घेतल्या आहेत. तर 80 टी-20 सामन्यांमध्ये 96 विकेट्स घेतले आहेत.

VIEW ALL

Read Next Story