शेवटी तुम्हाला Aadhaar Verification Completed म्हणजेच आधार पडताळणी पूर्ण झाली असा संदेश मिळेल. यावेळी जर तुम्हाला Error असा संदेश दाखवत असेल तर तुमचा आधार नंबर चुकीचा आहे अशी माहिती मिळेल.
या माहितीची पूर्तता केल्यानंतर Proceed Verify या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन वेब पेज सुरु होईल. यामध्ये अचूक आधार नंबर दिसेल. त्यानंतर EXISTS असा पर्याय दिसेल. यावरुन तुमचे आधार नंबर किंवा आधार कार्डची सत्यता पडताळणी पूर्ण होईल.
त्यानंतर तुम्हाला Verify An Aadhaar Number असा पर्याय उपलब्ध होईल. यावर क्लिक करा. या पेजवर आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
सुरूवातीला अधिकृत वेबसाईट uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर My Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. पुढे Aadhaar Services या पर्यायावर क्लिक करा.
घरबसल्या युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजेच युआयडीएआय (UIDAI) या वेबसाईटच्या माध्यमातून ही पडताळणी करता येते.
ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डला खूप महत्त्व आहे. तुमचे आधार कार्ड बोगस आहे की नाही? हे कसं ओळखायचे ते जाणून घ्या...