गॅस कंपन्यांनी नुकतंच आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून एलपीजी सिलेंडर बूक करण्याची सुविधा सुरु केली आहे.
या नव्या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांची एलपीजी सिलेंडर बुकिंग प्रक्रिया सोपी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
ग्राहक सध्या एलपीजी गॅस सिलेंडर बूक करण्यासाठी गॅस एजन्सीच्या क्रमांकावर किंवा त्यांच्या एजन्सीला किंवा वितरकाला कॉल करून किंवा कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन बूक करतात.
पण आता मात्र ते कंपनीच्या व्हॉट्सअॅप नंबरवर संदेश पाठवून सिलिंडर बूक करू शकता. बुकिंग कसं करायचं ते समजून घ्या...
तुम्ही Indane चे ग्राहक असल्यास, तुम्ही LPG सिलेंडर बूक करण्यासाठी 7718955555 या नवीन क्रमांकावर कॉल करू शकता.
तुम्ही व्हॉट्सअॅप अॅपद्वारेही बुकिंग करू शकता. WhatsApp मेसेंजरवर, REFILL टाइप करा आणि 7588888824 वर पाठवा.
ग्राहक फक्त कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवरून संदेश पाठवू शकेल.
तुम्हाला एचपी गॅस सिलिंडर बुक करायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअॅप वरुन 9222201122 क्रमांकावर मेसेज करू शकता. तुम्हाला BOOK टाइप करून या क्रमांकावर पाठवावे लागेल.
तुमचा एलपीजी कोटा, एलपीजी आयडी, एलपीजी सबसिडी यासह इतर अनेक सेवांबद्दल माहिती मिळवण्यासाठी देखील हा नंबर वापरला जाऊ शकतो.