भारत देशाला खेड्यांचा देश असे म्हटले जाते. कारण भारतात 6 लाखांहून अधिक गावे आहेत.
परंतु सध्या गावातील बहुतांश लोक हे शहरांकडे धाव घेताना दिसत आहेत.
पण राजस्थानमध्ये असे एक गाव आहे, जिथे आजही लोक जुनी परंपरा पाळत आहेत.
या गावातील लोक पैशाने श्रीमंत असले तरी ते मातीच्या घरात राहतात. इतकच नाही तर सर्व लोक शुद्ध शाकाहारी असून कोणतेही वेसन करत नाहीत.
खास गोष्ट म्हणजे या गावातील कोणत्याच घराला कुलूप नाहीये. तिथे चोरी देखील होत नाही.
आम्ही राजस्थानमधील देवमाळी गावाबद्दल बोलत आहोत. येथील लोकांची वेशभूषा आणि परंपरा कायम आहे.