पश्चिम बंगालमधील दिनाजपुरा जिल्ह्यातील हरिपुकुर गाव हे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर आहे.
भारत आणि बांगलादेश दरम्यान काढलेली सीमारेषा या गावातील अनेक घरांमधून जाते.
या गावातील अनेक घरांचा दरवाजा भारताच्या दिशेने आहे, तर मागील दरवाजा हा बांगलादेशच्या दिशेने उघडतो.
दोन्ही देशांच्या सीमेवर 70 हजारांहून अधिक लोक राहत असल्याचं एका अहवालामध्ये म्हटलं आहे.
या सीमेवर दोन्ही देशाचे सैनिक नेहमी गस्त घालण्यासाठी येत असतात.
या गावातील व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्यांना दोन्हीपैकी एका देशात जाण्यासाठी सैनिकांची परवानगी घ्यावी लागते.