61.8 कोटींचं चित्र....

61.8 कोटींचं चित्र, चित्रकाराच्या निधनानंतर तब्बल 82 वर्षांनी पेंटिंगची विक्री; पण त्यात नेमकं असं काय आहे?

चित्रांच्या प्रदर्शनाला गेला आहात का?

तुम्ही कधी चित्रांच्या प्रदर्शनाला गेला आहात का? तिथं गेलं असता जी चित्र विक्रीसाठी असतात त्या चित्रांची किंमत पाहूनच हैराण व्हायला होतं ना?

महिला चित्रकार अमृता शेरगिल

आता तुम्ही आणखी हैराण व्हाल, कारण एका हंगेरियन - भारतीय वंशाच्या महिला चित्रकार अमृता शेरगिल यांनी रेखाटलेलं चित्र तब्बल 61.8 कोटी रुपयांना विकलं गेलं आहे.

भारतीय चित्रकाराच्या चित्राला इतकी मोठी किंमत

अमृता शेरगिल या 20 व्या शतकातील सुरुवातीच्या काळातील काही महान चित्रकारांपैकी एक आहेत. कोणत्याही भारतीय चित्रकाराच्या चित्राला इतकी मोठी किंमत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

“द स्टोरी टेलर”

शेरगिल यांच्या 1937 मधील “द स्टोरी टेलर” या चित्राचा नुकताच लिलाव झाला. सॅफ्रन आर्टच्या ‘इवनिंग सेल: मॉडर्न आर्ट’मध्ये या चित्राचा लिलाव झाला.

गावातील दृश्य

शेरगिल यांनी रेखाटलेलं चित्र कॅनव्हासवर ऑईल पेंटचा वापर करत साकारण्यात आलं असून, ते एका गावातील दृश्य असल्याचं लक्षात येतं. हे एक असं ठिकाण आहे जिथं काही महिला बसलेल्या दिसत आहेत. अमृता शेरगिल यांच्या चित्राची खरेदी करणाऱ्या व्यक्तीनं या कलाकृतीतील अर्थ आणि मूळ रंगांमागील खरी कथा प्राधान्यस्थानी ठेवली.

80 वर्षांपूर्वीच जगाचा निरोप

आश्चर्याची बाब म्हणजे शेरगिल आज या जगात नाहीत. त्यांनी 80 वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. ज्यावेळी त्या अवघ्या 28 वर्षांच्या होत्या. प्रदीर्घ आजारपणामुळं त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जातं.

VIEW ALL

Read Next Story