हॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवतील इस्रायलच्या महिला सैनिक!

इस्रायलमधील लष्कराची चर्चा

इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यान सुरु असलेल्या युद्धामध्ये इस्रायल डिफेन्स फोर्स म्हणजेच इस्रायलमधील लष्कराची चर्चा आहे.

युद्धात महिलांचाही समावेश

इस्रायलमधील या युद्धात इस्रायल डिफेन्स फोर्सच्या अनेक महिला सैनिक प्रत्यक्ष मैदानात उतरुन लढत आहेत.

देशाच्या संरक्षणासाठी महिला युद्धभूमीवर

आपल्या देशाच्या संरक्षणासाठी या इस्रायली महिला जीवाची बाजी लावताना दिसत आहेत.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

इस्रायलमध्ये लष्करी सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या महिलांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आधी प्रामुख्याने पुरुष सैनिक होते

इस्रायल डिफेन्स फोर्सची स्थापना 1948 साली झाली. त्यावेळेस इस्रायलची लोकसंख्या कमी असल्याने प्रमुख्याने पुरुष सैनिकच होते.

महिलांनाही सहभागी करुन घेतलं

इस्रायलमधील सैन्य संख्या हळूहळू वाढवण्यात आली आणि त्यात महिलांनाही सहभागी करुन घेण्यात आलं.

महिलांची संख्या लक्षणीय

सध्याच्या घडीला इस्रायलमध्ये 1 लाख 25 हजारांहून अधिक सैनिक आहेत. ज्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे.

महिलांनाही लष्करी सेवा बंधनकारक

इस्रायलमध्ये आजही पुरुषांना 32 महिन्यांची लष्करी सेवा बंधनकारक असून महिलांसाठी ही कालमर्यादा 24 महिने म्हणजेच 2 वर्ष इतकी आहे.

राखीव सैन्य

या प्रशिक्षणानंतर इस्रायलमधील सर्वांना पुढील 10 वर्षांसाठी राखीव सैन्य म्हणून ग्राह्य धरलं जातं. यामध्ये महिलांचाही समावेश असतो.

तरुणी युद्धात सहभागी

गरज असेल तेव्हा या सर्वांना प्रत्यक्ष युद्धात सहभागी व्हावं लागतं. सध्या अशाच अनेक तरुणी युद्धात सहभागी झाल्या आहेत.

लष्करी गणेवशातील या तरुणींच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा दिसत आहे.

या लोकांना सेवा बंधनकारक नाही

तरुण महिलांना लष्करी सेवा बंधनकारक असली तरी विवाहित महिलांना, अपत्य असलेल्या महिलांना आणि धार्मिक सेवा देणाऱ्या पुरुषांना लष्करी सेवेचं बंधन नाही.

नेल पॉलिश आणि मेकअपची परवानगी

जास्तीत जास्त महिलांना लष्करात आकर्षित करण्यासाठी इस्रायलने महिलांना नेल पॉलिश आणि मेकअपची परवानगी दिली आहे.

मॉडेलप्रमाणेच वाटतात

याच कारणामुळे अनेक इस्रायली महिला सैनिक एखाद्या मॉडेलप्रमाणेच वाटतात.

VIEW ALL

Read Next Story