संध्याकाळच्या चहासोबत खा 'हे' 7 हेल्दी स्नॅक्स

तेजश्री गायकवाड
Jan 11,2025


असे अनेक पदार्थ आहेत जे संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता म्हणून खाल्ले तरी वजन वाढण्याची भीती नसते.

मखाना

मखाना हेल्दी असून ते खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. छान रोस्ट करून काळी मिरी आणि मीठ घालून याचा चहासोबत आस्वाद घ्या.

भाजलेले शेंगदाणे

हेल्दी स्नॅक्स म्हणून तुम्ही शेंगदाणे भाजून खाऊ शकतात. भाजलेले शेंगदाणे चहासोबत खा पण हे लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात खाऊ नका.

पॉपकॉर्न

हेल्दी स्नॅक्समध्ये पॉपकॉर्न हा एक चांगला पर्याय आहे. पॉपकॉर्न चव आणि आरोग्य या दोन्हीसाठी उत्तम आहे.

बीटरूट चिप्स

बीटरूट चिप्स आरोग्यासाठी देखील चांगले आहेत. चिप्स अधिक निरोगी बनवण्यासाठी तुम्ही बेक देखील करू शकता. एअर फ्राईंग हा देखील एक चांगला पर्याय आहे.

पोहे

पोह्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आणि शेंगदाणे वगैरे घालून शिजवावे. यामुळे त्याची चव आणि आरोग्य फायदे दोन्ही वाढतात.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story